Posted On:
23 OCT 2026 7:02PM by PIB Mumbai
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या एकेरी एसएल 3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नितेश कुमार याचे आणि रौप्यपदक मिळवल्याबद्दल प्रमोद भगत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. ही दोन्ही खेळाडूंनी केलेली एक अप्रतिम कामगिरी आहे आणि ते देशाचा अभिमान असाच उंचावत राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
समाज माध्यम 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केले:
"भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंची चमकदार कामगिरी! आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या एकेरी SL3 स्पर्धेत नितेश कुमार याने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि प्रमोद भगत याने रौप्यपदक मिळवल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. दोन्ही खेळाडूंनी केलेली ही एक अप्रतिम कामगिरी आहे. ते देशाचा अभिमान असाच उंचावत राहोत: PM @narendramodi"
***
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com