पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि तोमन कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 22 OCT 2026 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील पॅरा कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि तोमन कुमार यांचे अभिनंदन केले.

या खेळाडूंचा शानदार विजय कौशल्य, संयम आणि सांघिक कार्याचे एक असामान्य प्रदर्शन होते, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या या यशाने भारतीयांना आनंद झाला, असेही ते म्हणाले.

X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

"आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील पॅरा कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि तोमन कुमार यांचे अभिनंदन! त्यांचा हा शानदार विजय कौशल्य, संयम आणि सांघिक कार्याचे एक असामान्य प्रदर्शन होते. त्यांच्या या यशाने भारतीयांना आनंद झाला : PM @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326979) अभ्यागत कक्ष : 10