Posted On:
22 OCT 2026 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी SH6 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नित्या श्री सुमती सिवन आणि कृष्णा नागर यांचे अभिनंदन केले आहे.
या खेळाडुंच्या समर्पित वृत्तीमुळे भारतीय पॅरा बॅडमिंटनसाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण लाभल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. नित्या श्री सुमती सिवन आणि कृष्णा नागर यांना आगामी स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळावे यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,
"आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी SH6 क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल नित्या श्री सुमती सिवन आणि कृष्णा नागर यांचे अभिनंदन!
या खेळाडुंच्या समर्पित वृत्तीमुळे भारतीय पॅरा बॅडमिंटनसाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण लाभला.
आगामी स्पर्धांमध्येही त्यांना सातत्याने यश मिळत राहो हीच सदिच्छा. PM @narendramodi”
* * *
राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai