पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या रवी कार्तिक बुडिगिनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
21 OCT 2026 9:36PM by PIB Mumbai
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक एस-13 प्रकारात उत्कृष्ट जलतरण कामगिरी करत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रवी कार्तिक बुडिगिनाचे अभिनंदन केले.
त्याचे कौशल्य आणि कठोर परिश्रम यांमुळे देशाचा गौरव वाढला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आगामी स्पर्धांमध्येही त्याला सातत्याने यश मिळावे, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“रवी कार्तिक बुडिगिनाची जलतरणातील उत्कृष्ट कामगिरी!
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक एस-13 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याचे कौशल्य आणि कठोर परिश्रम यांमुळे देशाचा गौरव वाढला आहे. आगामी स्पर्धांमध्येही त्याला सातत्याने यश मिळो, अशा शुभेच्छा, PM @narendramodi”
***
NehaKulkarni / ShradhhaMukhedkar / DIneshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2326395)
अभ्यागत कक्ष : 6