पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रीती पाल हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.

Posted On: 20 OCT 2026 8:59PM by PIB Mumbai

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 200 मीटर  T35 क्रीडाप्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल  हिचे अभिनंदन केले आहे.

प्रीतीने  जिद्द आणि समर्पणाचा एक उत्तम वस्तुपाठ घालून दिला आहे असे सांगून पंतप्रधानांनी तिचे अभिनंदन केले आणि यशाची ही मालिका आपल्या आगामी स्पर्धांमध्येही ती कायम राखेल, अशी आशा व्यक्त केली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

चिकाटी आणि समर्पणाचे एक उत्तम उदाहरण.

प्रीती पालने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 200 मीटर  T35 क्रीडाप्रकारात रौप्यपदक मिळवले. तिच्या या यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन ! आगामी स्पर्धांमध्ये देखील यशाची ही मालिका अशीच कायम राहो. तिला खूप खूप शुभेच्छा : PM @narendramodi"

***

NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325867) अभ्यागत कक्ष : 9