पंतप्रधान कार्यालय
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल हिमांशू नांदलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
20 OCT 2026 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर फ्रीस्टाइल एस-11 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल हिमांशू नांदलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
हिमांशूच्या उत्कृष्ट जलतरण कामगिरीचे कौतुक करताना, त्याची कामगिरी प्रयत्न, सहनशक्ती आणि शिस्त यांचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच, त्याच्या आगामी क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“हिमांशू नांदलची उत्कृष्ट जलतरण कामगिरी!
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर फ्रीस्टाइल एस-11 प्रकारात त्यांनी कांस्यपदक जिंकले आहे. त्याची कामगिरी प्रयत्न, सहनशक्ती आणि शिस्त यांचे प्रतिबिंब आहे. त्याचे अभिनंदन!
आगामी क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा : PM @narendramodi"
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325640)
अभ्यागत कक्ष : 7