पंतप्रधान कार्यालय
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक अशोकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
20 OCT 2026 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनी गटातील पॅरा भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक अशोक याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
अशोक याची चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा अभिमान वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. तसेच, त्याच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“अशोक याची उत्कृष्ट कामगिरी!
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनी गटातील पॅरा भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन! त्याची चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा अभिमान वाटतो. त्याच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा : PM @narendramodi"
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325625)
अभ्यागत कक्ष : 5