Posted On:
19 OCT 2026 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ-46 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल अजित सिंह याचे अभिनंदन केले आहे.
अजित सिंह याने कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत जिद्द दाखवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले. तसेच, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की,
"अजित सिंह यांनी उत्कृष्ट कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ-46 प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. त्यांचे अभिनंदन. तसेच, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा : PM @narendramodi”
* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai