Posted On:
19 OCT 2026 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ46 प्रकारात 65.11 मीटर अंतराची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल रिंकू हुडाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
रिंकू हुडाची उत्कृष्ट कामगिरी, त्याची शिस्त आणि समर्पण अधोरेखित करते, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी रिंकू हुडाला भविष्यातही सातत्याने यश मिळावे, अशा शुभेच्छा दिल्या आणि त्याने यशाची नवनवीन शिखरे गाठत राहावे, अशी इच्छा व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने X वरील संदेशात म्हटले आहे:
“रिंकू हुडाची ही मोठी कामगिरी आहे! 65.11 मीटर अंतराची शानदार, हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रिंकूने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे! त्याची उत्कृष्ट कामगिरी त्याची शिस्त आणि समर्पण अधोरेखित करते. त्याने यशाची नवनवीन शिखरे गाठत राहावे, अशा शुभेच्छा : PM @narendramodi”
* * *
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai