ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि सौदी अरेबियादरम्यान द्विपक्षीय विद्युत आंतरजोडणी उपक्रमाबाबत चर्चा

Posted On: 19 OCT 2026 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

विद्युत मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांनी सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाचे वीजविषयक व्यवहारांचे सहाय्यक मंत्री इंजिनिअर नासर अल-काहतानी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय बैठक घेतली.

या बैठकीत भारत-सौदी अरेबिया मधील वीजजोडणी उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच, दोन्ही देशांमधील वीज क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली.

प्रस्तावित वीजजोडणी उपक्रमाच्या प्रगतीवर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. या उपक्रमामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होण्याची मोठी क्षमता आहे. उपक्रमाच्या पुढील वाटचालीबाबत दोन्ही बाजूंनी आपली मते मांडली. तसेच, हा उपक्रम पुढे नेण्यासाठी नियमित संवाद आणि सातत्यपूर्ण सहकार्य आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

दोन्ही देशांनी तांत्रिक सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान यांवर भर दिला. तसेच, वीज क्षेत्रातील परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या शक्यतांवरही चर्चा केली.

सौदी अरेबियाने अति उच्च दाबाच्या (ईएचव्ही) वीज पारेषण यंत्रणा, वीज ग्रीडमध्ये अक्षय ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक आणि कार्यान्वयनविषयक आव्हानांवर उपाययोजना, डेटा सेंटर्सची वाढती विजेची गरज पूर्ण करण्यासाठी धोरणांची आखणी आणि वीज यंत्रणेच्या बदलत्या गरजांनुसार ग्रीड संहिता अद्ययावत करणे या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची इच्छा व्यक्त केली.

वीज क्षेत्रातील भारत-सौदी अरेबिया भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी रचनात्मक संवाद आणि चर्चा सुरू ठेवण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला.

 

* * *

निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325309) अभ्यागत कक्ष : 6