गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंजाबमध्ये चित्ता (सिंथेटिक ड्रग्स) या अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांविरोधात आवाज उठवल्यामुळे प्राण गमावलेल्या मानस, संगरूर आणि गुरुदासपूर येथील मृतांच्या कुटुंबीयांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या 20 ऑक्टोबर 2026 रोजी घेणार भेट


पंजाब सरकारने राज्याला अमली पदार्थांच्या दरीत लोटण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही, या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना आपली मुले गमवावी लागली आहेत : केंद्रीय गृहमंत्री

कुटुंबियांच्या वाट्याला आलेले हे दुःख शब्दांत व्यक्त करता येण्यासारखे नाही

या अमली पदार्थांच्या काळ्या धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, राज्यातील जनता याला योग्य ते उत्तर देईल

केंद्र सरकार अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगवास घडवेल आणि पंजाब तसेच संपूर्ण देश अमली पदार्थांच्या धोक्यापासून मुक्त होईल याची सुनिश्चिती करेल

Posted On: 18 OCT 2026 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑक्‍टोबर 2026

 

चित्ता (सिंथेटिक ड्रग्स) या अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांविरोधात आवाज उठवल्यामुळे प्राण गमवावे लागलेल्या, पंजाबमधील मानस, संगरूर आणि गुरुदासपूर इथल्या मृतांच्या कुटुंबीयांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या 20 ऑक्टोबर 2026 रोजी भेट घेणार आहेत.

या संदर्भात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी X या समाजमाध्यमावर एक संदेश सामायिक केला आहे. पंजाब सरकारने राज्याला अमली पदार्थांच्या दरीत लोटण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही, या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना आपली मुले गमवावी लागली आहेत. हे कुटुंब सहन करत असलेले दुःख शब्दांत सांगण्यापलीकडचे आहे, असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे. अमली पदार्थांच्या या काळ्या धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे आवाज दाबण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत आणि राज्यातील जनता याला योग्य ते उत्तर देईल असे शाह यांनी म्हटले आहे . पंजाबसोबतच संपूर्ण देश अमली पदार्थांच्या धोक्यापासून पूर्णपणे मुक्त व्हावा याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्र सरकार चित्ता या अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित असलेल्यांचा शोध घेईल आणि त्यांना तुरुंगवास घडवला जाईल असे शाह यांनी म्हटले आहे.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324973) अभ्यागत कक्ष : 8