संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ताजिकिस्तानमध्ये होणाऱ्या एससीओच्या सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार

Posted On: 18 OCT 2026 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑक्‍टोबर 2026

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 19-20 ऑक्टोबर 2026 रोजी ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांच्या परिषदेच्या (सीएचजी) 25 व्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या बैठकीत एससीओ सदस्य देशांमधील बहुपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः व्यापार, अर्थव्यवस्था, गुंतवणूक, संपर्कव्यवस्था, नवोन्मेष तसेच सांस्कृतिक आणि मानवतावादी देवाणघेवाण या क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा होणार आहे. याशिवाय, सुरू असलेल्या सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि संघटनेच्या आर्थिक व संस्थात्मक कामकाजाशी संबंधित निर्णयांवर विचार करणे अपेक्षित आहे.

भारत एससीओच्या विविध यंत्रणांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून, स्टार्टअप आणि नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच लोकांमधील परस्पर देवाणघेवाण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्यामध्ये योगदान देत आहे. या बैठकीमुळे संघटनेच्या चौकटीत व्यावहारिक आणि परस्पर लाभदायक सहकार्य पुढे नेण्याबाबत भारताला इतर एससीओ सदस्य देशांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे.

यापूर्वी सीएचजीची बैठक 18 नोव्हेंबर 2025 रोजी रशियातील मॉस्को येथे झाली होती. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले होते.

 

* * *

नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324893) अभ्यागत कक्ष : 10