पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीएक्यूएम द्वारे एनसीआर मधील अनुपालन स्थिती आणि अंमलबजावणी कारवाईचा आढावा; 25.09.2026 ते 09.10.2026 दरम्यान 124 तपासण्या पूर्ण


तपासणीदरम्यान लाल आणि नारंगी श्रेणीतील उद्योगांना प्राधान्य देण्याचे फ्लाइंग स्क्वॉड अर्थात भरारी पथकांना निर्देश

Posted On: 17 OCT 2026 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2026

 

कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट इन एनसीआर अँड ॲडजॉइनिंग एरियाज, सीएक्यूएम  ने 16 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केलेल्या एनफोर्समेंट टास्क फोर्स  च्या 141 व्या बैठकीत, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे एनसीआर  मधील अंमलबजावणी कारवाया, तपासणीतील निष्कर्ष आणि नियमांचे पालन  करण्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

25.09.2026 ते 09.10.2026 या 15 दिवसांच्या कालावधीत एकूण 124 तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये बांधकाम आणि पाडकाम प्रकल्पांच्या 6, औद्योगिक क्षेत्रातील 54 आणि डिझेल जनरेटर  संचांशी संबंधित 64 तपासण्यांचा समावेश होता. या तपासण्यांमध्ये 55 ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले; ज्यामध्ये बांधकाम व पाडकाम  प्रकल्पांमधील 5, औद्योगिक क्षेत्रातील 35 आणि डिजेल जनरेटर संचांशी संबंधित 15 प्रकरणांचा समावेश आहे.

आढळलेल्या नियमांच्या उल्लंघनांच्या आधारे, विविध अंमलबजावणी कारवाया प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन बांधकाम व पाडकाम प्रकल्प आणि तीन औद्योगिक युनिट्स बंद करणे; औद्योगिक आणि डिजी क्षेत्रातील 12 युनिट्स सील करणे; तसेच एका सीएन्डडी  प्रकरणासाठी, पाच औद्योगिक प्रकरणांसाठी आणि एका डिजी संबंधित प्रकरणासाठी अनुपालनाबाबत आदेश किंवा सूचना जारी करणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पर्यावरण भरपाई  आकारणे, पुन्हा तपासणी करणे, प्रकरणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ  आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे  सोपवणे, तसेच प्रकल्प प्रवर्तक आणि संबंधित प्राधिकरणांना सल्लागार सूचना किंवा पत्रे पाठवणे यांसारख्या उपाययोजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

  

ईटीएफने आपल्या 140 व्या बैठकीत विचारात घेतलेल्या प्रकरणांवरील  कारवाईचा आढावा घेतला. अशी प्रकरणे बंद करणे, डीजी सेट सील करणे, ईसी पत्रे आणि सूचना जारी करणे, विशिष्ट प्रकरणे  सीपीसीबी/एसपीसीबी यांच्याकडे पाठवणे आणि पुनर्तपासणी करणे यासह विविध अंमलबजावणी करण्याच्या उपायांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.  कार्यदलाने मागील बैठकीनंतर जारी केलेल्या पुनश्च सुरुवात करण्याच्या आदेशांचाही आढावा घेतला.दिनांक 15.10.2026 रोजी,बांधकाम आणि पाडकाम (C&D) करण्याच्या  जागांशी संबंधित तीन पुनरारंभ आदेश जारी करण्यात आले होते. यांपैकी दोन जागा हरियाणात आणि एक उत्तर प्रदेशात होती. या व्यतिरिक्त,अंतिम निर्णयासाठी तीन प्रकरणे संबंधित राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे (SPCBs) किंवा प्राधिकरणांकडे हस्तांतरित करण्यात आली. यामध्ये एक औद्योगिक प्रकरण आणि दोन बांधकाम व पाडकाम (C&D) प्रकरणांचा समावेश होता, ज्यापैकी एक प्रकरण दिल्लीशी आणि दोन हरियाणाशी संबंधित होती.

ईटीएफने आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या एकत्रित अंमलबजावणीच्या अद्ययावत स्थितीचा आढावा घेतला.दिनांक 16.10.2026, पर्यंत, फ्लाइंग स्क्वॉडने एनसीआरमधील 28,868 केंद्रे(युनिट्स), प्रकल्प आणि संस्थांची  तपासणी केली होती. या तपासण्यांच्या आधारे, त्यापैकी 1,837 बंद करण्याचे निर्देश (Closure Directions)   देण्यात आले होते.यापैकी, पालन करण्याच्या आदेशांच्या पडताळणीनंतर 1,491 जागांवर कामकाज पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. आणखी 130 प्रकरणे अंतिम निर्णयासाठी संबंधित राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे (SPCBs) किंवा दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीकडे (DPCC) हस्तांतरित करण्यात आली होती, तर 216 संस्थांना कामकाज पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी करणे बाकी होते.

संबंधित क्षेत्रांमध्ये जारी केलेल्या अंमलबजावणी आदेशांच्या स्थितीचाही इटीएफने आढावा घेतला.दिनांक 15.10.2026, रोजी, औद्योगिक क्षेत्रात एकूण 34, सी अँड डी क्षेत्रात 29 आणि डीजी सेटच्या संदर्भात 27 ऑर्डर्स जारी करण्यात आल्या होत्या.अतिरिक्त माहिती, वैयक्तिक सुनावणी आणि पुनर्तपासणी आवश्यक असलेल्या प्रकरणांचा समावेश असलेल्या प्रकरणांच्या निकालाची आणि प्रक्रियेची नोंद कार्यदलाने घेतली आहे.

 

* * *

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324816) अभ्यागत कक्ष : 5