कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
महाराष्ट्र, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमधील पाच आयटीआय क्लस्टर्ससाठी पीएम सेतू अंतर्गत राष्ट्रीय सुकाणू समितीकडून ₹1,194.92 कोटींच्या गुंतवणुकीस मंजुरी
टाटा स्टील फाऊंडेशन, बीव्हीजी इंडिया , बेलराईस इंडस्ट्रीज, ईगल इन्फ्रा इंडिया आणि इंदरदीप इन्फ्रा इंडिया यां कंपन्या पाच आयटीआय क्लस्टर्सच्या श्रेणीसुधारणेसाठी करणार भागीदारी; PM-SETU अंतर्गत मंजूर झालेली एकत्रित गुंतवणूक ₹3,687 कोटींवर पोहोचली
Posted On:
16 OCT 2026 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2026
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबश्री मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली 'प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आयटीआय' (PM-SETU) च्या राष्ट्रीय सुकाणू समितीची सहावी बैठक आज आयोजित करण्यात आली. या समितीने योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि महाराष्ट्र, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमधील आयटीआय क्लस्टर्ससाठी ₹1,194.92 कोटी मूल्याच्या पाच धोरणात्मक गुंतवणूक योजनांना(एसआयपी) मंजुरी दिली.
या मंजूरीसह, पीएम सेतू अंतर्गत मंजूर झालेली एकत्रित गुंतवणूक आतापर्यंत ₹3,687 कोटींवर पोहोचली असून, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (ITIs) आधुनिक, उद्योगांशी सुसंगत आणि भविष्यासाठी सज्ज कौशल्य संस्थांमध्ये रूपांतर करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांमधील हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
“राष्ट्रीय सुकाणू समितीने दिलेली मंजुरी ही PM-SETU च्या अंमलबजावणीमधील एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे आयटीआय बळकट होण्यास, प्रशिक्षण सुधारण्यास आणि उद्योगांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. आम्ही क्लस्टर्सना आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्याच्या दिशेने काम करण्यास आणि त्यांच्यासाठी मंजूर अंमलबजावणी योजनांमध्ये किमान एका वर्ल्डस्किल्स-संरेखित ट्रेड किंवा क्षमता क्षेत्राचा समावेश करण्यास प्रोत्साहन देतो. प्रशिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि तरुणांना अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून देणारी कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणे हा आमचा उद्देश आहे. जम्मू-काश्मीरने केलेली प्रगती उत्साहवर्धक असून, ती या क्षेत्रातील तरुणांसाठी कौशल्य वाढवण्याच्या आणि संधी निर्माण करण्याच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे,” असे बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना एमएसडीई च्या सचिव देबश्री मुखर्जी म्हणाल्या.
मान्यताप्राप्त धोरणात्मक गुंतवणूक योजना पीएम सेतू चौकटी अंतर्गत राज्य सरकारे, उद्योग भागीदार आणि सहभागी आयटीआय यांच्यातील भागीदारीद्वारे राबवल्या जातील. हे प्रकल्प पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, उद्योगांशी सुसंगत अभ्यासक्रमांचा समावेश करणे, प्रशिक्षकांची क्षमता बळकट करणे, उद्योगांचा सहभाग वाढवणे आणि तरुणांसाठी रोजगार परिणाम सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतील.
मान्यताप्राप्त क्लस्टर्स खालीलप्रमाणे आहेत:
टाटा स्टील फाऊंडेशनच्या भागीदारीत ओडिशातील कटक आयटीआय क्लस्टरचा दर्जा उंचावला जाणार.
पुणे आयटीआय क्लस्टरचे बीव्हीजी इंडिया बरोबर भागीदारीत श्रेणीवर्धन होणार
राष्ट्रीय सुकाणू समितीने महाराष्ट्रातील पुणे आयटीआय क्लस्टरसाठी 241 कोटी रुपयांच्या धोरणात्मक गुंतवणूक योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि बीव्हीजी फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे राबवली जाईल.
या क्लस्टरमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) , औंध, पुणे' हे मुख्य केंद्र असेल, तर 'शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध (महिला)', 'शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पिंपरी-चिंचवड', 'शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था' खेड (राजगुरुनगर)' आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुळशी' हे उप-केंद्र (Spokes) म्हणून समाविष्ट असतील.
छत्रपती संभाजीनगर आयटीआय क्लस्टरचे बेलराईज इंडस्ट्रीज बरोबर भागीदारीत श्रेणीवर्धन होणार
या समितीने बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागीदारीत, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आयटीआय क्लस्टरसाठी ₹ 238.01 कोटी किमतीच्या धोरणात्मक गुंतवणूक योजनेला मंजुरी दिली.
क्लस्टरमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय ) छत्रपती संभाजीनगर हे मुख्य केंद्र असेल आणि शासकीय आयटीआय पैठण, शासकीय आयटीआय खुलताबाद, शासकीय आयटीआय फुलंब्री आणि शासकीय आयटीआय गंगापूर हे उप-केंद्र म्हणून समाविष्ट आहेत.
पीएम-सेतू च्या घटक II अंतर्गत 'प्रशिक्षक प्रशिक्षण' उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा
राष्ट्रीय सुकाणू समितीने पीएम-सेतू योजनेच्या घटक-II अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या 'प्रशिक्षक प्रशिक्षण' कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या उपक्रमाचा उद्देश उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम अशा प्रशिक्षकांची एक मोठी फळी तयार करणे हा आहे, जे समकालीन तांत्रिक आणि अध्यापनविषयक कौशल्यांनी सज्ज असतील.
ऑक्टोबर 2026 पर्यंत, 'राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमांतर्गत 3744 प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.




* * *
राधिका अघोर/शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324490)
अभ्यागत कक्ष : 7