अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआय आणि सीबीएन यांनी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील वन्यजीव अभयारण्यात 2.87 हेक्टर क्षेत्रामधील बेकायदा गांजाची लागवड केली नष्‍ट

Posted On: 15 OCT 2026 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026

डीआरआय -डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच महसूल गुप्तचार संचालनालयाला मिळालेल्या गुप्त संदेशानुसार  महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्‍ये  जामनियापाणी गावाजवळ असलेल्या एका वन्यजीव अभयारण्यात मोठ्या क्षेत्रामध्‍ये केलेली बेकायदा गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, डीआरआय  आणि सीबीएन म्हणजेच केंद्रीय अंमली पदार्थ ब्युरो यांनी  काल ( दि.14 )  संबंधित अभयारण्‍यातील स्थानाला भेट दिली आणि  धडक कारवाई केली.  

या पथकाला अभयारण्यातील दुर्गम आणि घनदाट जंगल असलेल्या भागात पाच वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची बेकायदा केलेली लागवड आढळून आली.  एकूण 2.87  हेक्टर (म्हणजेच 7.08  एकर ) क्षेत्रावर गांजा लावण्‍यात आला होता. दुर्गम भूप्रदेश, वन्यप्राण्यांचा धोका आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव यामुळे ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र, अधिकाऱ्यांनी पूर्ण खबरदारी घेवून  आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करून,  ही मोहीम यशस्वी  पूर्ण केली. याबाबतच्या  सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'रोटाव्हेटर'या कृषी यंत्राचा  वापर करून गांजाचे पीक नष्ट करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जामनियापाणी गावाजवळील वन्यजीव अभयारण्यात केलेली गांजाची अवैध लागवड

संपूर्ण भारतामध्‍ये  अशा प्रकारे  पिकांची अवैध  लागवड नष्ट करण्याची मोहीम डीआरआय आणि सीबीएन सुरू ठेवणार आहेत. अंमली पदार्थांच्या बेकायदा व्यापाराविरुद्ध लढा देण्यासाठी आणि भविष्यासाठी अंमली पदार्थमुक्त तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी या दोन्‍ही संस्था कटिबद्ध आहेत.


राधिका अघोर/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2324156) अभ्यागत कक्ष : 9