पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 13 OCT 2026 10:07PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2026

ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि सार्वजनिक सेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

एक्स या समाजमाध्यमा वरील एका पोस्टमध्ये, सुनक यांनी पंतप्रधानांचे समर्पण , कार्याप्रति निष्ठा  आणि ऊर्जा यांची प्रशंसा केली आणि विशेषतः व्यापार, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रांमध्ये भारत-यूके संबंध अधिक दृढ होत असल्याचे अधोरेखित केले.

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटले की,

“आज ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये तुम्हाला भेटून खूप आनंद झाला."

सुषमा काणे /राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2323533) अभ्यागत कक्ष : 4