पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देवी नारायणीच्या आशीर्वादाचे आवाहन करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
Posted On:
14 OCT 2026 9:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी नारायणीला वंदन करत, संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. परम मंगलमयी, कल्याणस्वरूपिणी, तसेच सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणारी, अशी देवीची स्तुती या सुभाषितात आहे. गौरीमाता असे संबोधून शरण येणाऱ्यांचे संरक्षण करण्याचे आवाहनदेखील या श्लोकात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर हे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
“सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥”
***
NitinFulluke / SonaliKakde / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323083)
अभ्यागत कक्ष : 5