मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी डिजिटल प्रशासन मजबूत करण्याच्या दृष्टीने डीबीआयएम-अनुरूप डीएएचडी संकेतस्थळाचे केले उद्घाटन
Posted On:
13 OCT 2026 4:41PM by PIB Mumbai
देशाची डिजिटल प्रशासन परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने (डीएएचडी) आज आपले सीबीआयएम-अनुरूप संकेतस्थळ सुरू केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सादर केलेल्या डिजिटल ब्रँड आयडेंटिटी मॅन्युअल (सीबीआय एम) आवृत्ती 3.0 च्या अनुषंगाने विकसित करण्यात आले आहे.


सुधारित संकेतस्थळाचे उद्घाटन करताना केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय व पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह म्हणाले: "पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या डीबीआयएम-अनुरूप संकेतस्थळाचे उद्घाटन हे आपली डिजिटल उपस्थिती मजबूत करण्याच्या आणि शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व नागरिक-केंद्रित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' आणि 'किमान सरकार, कमाल प्रशासन' या दृष्टिकोनानुरूप आहे.”
डीएएचडी संकेतस्थळ हे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या प्रमुख योजना आणि उपक्रमांचे प्रदर्शन करणारे एक-खिडकी डिजिटल केंद्र आहे. यावर पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF), राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM), राष्ट्रीय पशुधन मिशन (NLM) आणि पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम (LHDCP) यांसारख्या योजनांचा समावेश आहे. हे संकेतस्थळ, योजना-संबंधित माहिती, मार्गदर्शक तत्त्वे, संसाधने आणि संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहज प्रवेश प्रदान करते. यामुळे हितधारकांना विभागीय उपक्रम आणि त्यांच्या अंमलबजावणीबद्दल माहिती मिळवणे शक्य होते.
अधिक माहितीसाठी, डीएएचडीच्या नवीन संकेतस्थळाला भेट द्या: www.dahd.gov.in
***
Sonali Kulkarni / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322946)
अभ्यागत कक्ष : 6