अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या कारवाईत डीआरआय तर्फे रेल्वे प्रवाशाकडून सुमारे 5.75 किलो क्रिस्टल मेथ जप्त ; एकाला अटक

Posted On: 11 OCT 2026 10:25AM by PIB Mumbai

 

08/09-10/2026 रोजी एका गुप्त माहितीवर आधारित कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), मंगळूर प्रादेशिक युनिटने दिल्लीहून बंगळूरुला रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अडवले. प्रवाशाच्या ट्रॉली बॅगची सखोल तपासणी केली असता, त्यात मेथाम्फेटामाइन (क्रिस्टल मेथ) असल्याचा संशय असलेले 5.753 किलो वजनाची तीन पाकिटे सापडली.

हा संशयित अंमली पदार्थ, अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारी औषधे (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आणि त्यानंतर सक्षम एनडीपीएस न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

मेथाम्फेटामाइन हे सामान्यतः क्रिस्टल मेथ किंवा आईस म्हणून ओळखले जाणारे एक शक्तिशाली, अत्यंत व्यसनाधीन करणारे कृत्रिम मनोत्तेजक आहे जे केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करते. त्याच्या गैरवापरामुळे व्यसन लागू शकते. त्याचे गंभीर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. भारतात मेथाम्फेटामाइन हा अंमली पदार्थ मनावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत नियंत्रित केला जातो. या कायद्यानुसार या अंमली पदार्थाचा अनधिकृत ताबा, उत्पादन, विक्री, खरेदी, वाहतूक, आयात किंवा निर्यात करणे शिक्षेस पात्र आहे. शिक्षेची तीव्रता गुन्ह्याचे स्वरूप आणि संबंधित प्रमाणावर अवलंबून असते. या प्रकरणात, जप्त केलेले 5.753 किलो प्रमाण हे मेथाम्फेटामाइनसाठी अधिसूचित व्यावसायिक प्रमाण असलेल्या 50 ग्रॅमपेक्षा खूप जास्त असून यासाठी 10 ते 20 वर्षांच्या सक्त कारावासाची आणि 1-2 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

गुप्तचर माहितीवर आधारित अंमलबजावणीद्वारे अमली पदार्थांच्या तस्करीचा मुकाबला करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे.

***

नितीन फुल्लुके / श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321912) अभ्यागत कक्ष : 21