पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी कुची रांगकाऊ झेलियांग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Posted On: 10 OCT 2026 8:00AM by PIB Mumbai

नागालँडचे उपमुख्यमंत्री टी. आर. झेलियांग यांचे पुत्र कुची रांगकाऊ झेलियांग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुःखद प्रसंगी त्यांनी शोकाकुल कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रपरिवाराप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या. तसेच मृताच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे की,

नागालँडचे उपमुख्यमंत्री टी. आर. झेलियांग यांचे पुत्र कुची रांगकाऊ झेलियांग यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. या कठीण प्रसंगी झेलियांग कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. मृतांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना.

***

शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2321715) अभ्यागत कक्ष : 14