पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लालकृष्ण अडवाणी यांना भेटून घेतले आशीर्वाद
Posted On:
07 OCT 2026 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.अडवाणी यांच्या दशकांच्या सार्वजनिक सेवेचा आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा मोदी यांनी गौरव केला. अडवाणीजींचे हे योगदान देशाच्या प्रगतीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
एक्स वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले:
"अडवाणी जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यांची दशकांची सार्वजनिक सेवा आणि आपल्या राष्ट्रीय जीवनातील त्यांचे योगदान यांनी अत्यंत खोल आणि कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे.
भारताची प्रगती मजबूत करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे."
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320837)
अभ्यागत कक्ष : 4
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam