सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

9 ऑक्टोबरच्या जागतिक टपाल दिनापासून 15 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय टपाल सप्ताह 2026 चे आयोजन

Posted On: 06 OCT 2026 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

टपाल विभाग 9 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या 'जागतिक टपाल दिना'पासून 15 ऑक्टोबर पर्यंत 'राष्ट्रीय टपाल सप्ताह' साजरा करणार आहे. यंदाच्या जागतिक टपाल दिनाची संकल्पना 'जागतिक टपाल दिन: एक टपाल नेटवर्क, अगणित शक्यता' अशी आहे. टपाल सेवा अधिक सुलभ, सुगम आणि नागरिकांच्या बदलत्या गरजांना तत्परतेने प्रतिसाद देणाऱ्या बनवण्यासाठी विभागाकडून सुरू असलेल्या निरंतर प्रयत्नांवर यंदाच्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा मुख्य भर असेल. 

या सप्ताहात विशेष संकल्पनांवर आधारित दिवस असतील, ज्यातील प्रत्येक दिवस आधुनिक, सर्वसमावेशक आणि नागरिक केंद्रित टपाल व्यवस्था उभारण्यातील विभागाच्या महत्त्वाच्या योगदानावर प्रकाश टाकेल. हा उपक्रम आर्थिक समावेशन बळकट करण्यात, डिजिटल सक्षमीकरणाला चालना देण्यात, कार्यक्षम टपाल आणि पार्सल सेवा सुलभ करण्यात, तिकीट संग्रहाला प्रोत्साहन देण्यात तसेच संपूर्ण टपाल नेटवर्कमध्ये तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना पुढे नेण्यात 'इंडिया पोस्ट'ची भूमिका ठळकपणे मांडेल.

सप्ताहाची सुरुवात 9 ऑक्टोबर 2026 (शुक्रवार) रोजी 'जागतिक टपाल दिना'ने होईल. हा दिवस टपाल सेवांचे जागतिक महत्त्व आणि लोक, समुदाय व व्यवसायांना परस्परांशी जोडण्यात टपाल नेटवर्कची कायमस्वरूपी भूमिका अधोरेखित करेल. तसेच संवाद बळकट करण्यात आणि आवश्यक सेवांपर्यंत पोहोच सुलभ करण्यात टपाल सेवांच्या योगदानाचा गौरव करण्याची संधीही या निमित्ताने मिळेल.

12 ऑक्टोबर 2026 (सोमवार) रोजी तिकीट संग्रहाचे समृद्ध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक पैलू अधोरेखित करणारा  'फन विथ फिलाटेली डे' साजरा केला जाईल.

13 ऑक्टोबर 2026 (मंगळवार) रोजी 'आर्थिक समावेशन आणि ग्राहक केंद्रित सेवा दिन' साजरा केला जाईल. 14 ऑक्टोबर 2026 (बुधवार) रोजी 'टपाल आणि पार्सल दिन' साजरा केला जाईल.

या सप्ताहाची सांगता 15 ऑक्टोबर 2026 (गुरुवार) रोजी 'तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिना'ने होईल.

राष्ट्रीय टपाल सप्ताह 2026 हा 'इंडिया पोस्ट'च्या समृद्ध वारशाचा गौरव करण्याची आणि नागरिकांच्या बदलत्या गरजांनुसार त्यात झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकण्याची एक उत्तम संधी ठरेल. याद्वारे  इंडिया पोस्टची एक आधुनिक, सर्वसमावेशक, तंत्रज्ञान-सक्षम आणि नागरिक-केंद्रित टपाल नेटवर्क म्हणून असलेली संकल्पना अधिक बळकट होईल आणि  नवोपक्रम, सुलभता आणि उत्कृष्ट सेवेच्या माध्यमातून नव्या शक्यता निर्माण करत लोक आणि समुदायांना जोडण्याचे कार्य निरंतर पुढे नेईल.


निलिमा चितळे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319848) अभ्यागत कक्ष : 12