पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे जलव्यवस्थापनाचे मॉडेल 'ग्लोबल साउथ'साठी कसे उपयुक्त ठरत आहे, यावरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 06 OCT 2026 3:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज भारताचे जलव्यवस्थापनाचे मॉडेल व्यापक 'ग्लोबल साउथ' देशांसाठी कसे उपयुक्त ठरत आहे, यावर भाष्य करणारा एक लेख सामायिक केला. जलसुरक्षा ही केवळ पायाभूत सुविधांच्या उभारणीपुरती मर्यादित नसून, ती उत्तम नियोजन, सक्षम स्थानिक यंत्रणा आणि जल  व्यवस्थापनात लोकसहभाग सुनिश्चित करण्याशी संबंधित असल्याचे, त्यांनी सांगितले.

 गुजरात मधील जलसुधारणांपासून सुरू झालेला आणि राष्ट्रीय स्तरावरील व्यापक उपक्रमांपर्यंत पोहोचलेला भारताचा हा प्रवास, पाणी व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणू इच्छिणाऱ्या आणि पाण्याची वाढती  गरज भागवू पाहणाऱ्या देशांसाठी एक व्यावहारिक उदाहरण वस्तुपाठ म्हणून समोर ठेवतो, असे त्यांनी नमूद केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट केले:

 

"भारताचे जल-व्यवस्थापन मॉडेल व्यापक 'ग्लोबल साउथ' देशांसाठी अत्यंत उपयुक्त वस्तुपाठ  देत आहे. जलसुरक्षा ही केवळ पायाभूत सुविधांच्या उभारणीपुरती मर्यादित नसून, ती उत्तम नियोजन, सक्षम स्थानिक यंत्रणा आणि पाणी व्यवस्थापनात लोकसहभाग सुनिश्चित करण्याशी संबंधित आहे. गुजरात मधील जलसुधारणांपासून सुरू झालेला आणि राष्ट्रीय स्तरावरील व्यापक उपक्रमांपर्यंत पोहोचलेला भारताचा हा प्रवास, पाणी व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणू इच्छिणाऱ्या आणि पाण्याच्या वाढत्या गरजा भागवू पाहणाऱ्या देशांसाठी एक व्यावहारिक उदाहरण वस्तुपाठ म्हणून समोर ठेवतो." 

https://indianexpress.com/article/opinion/columns/from-india-to-global-south-a-gujarat-water-governance-model-10908115/lite/

***

निलिमा चितळे /वैभवी जोशी / दिनेश यादव

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2319701) अभ्यागत कक्ष : 16