पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अंतिम पंघालचे केले अभिनंदन
Posted On:
04 OCT 2026 9:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल अंतिम पंघालचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी तिच्या कामगिरीचे कौतुक करत ती अनुकरणीय असल्याचे म्हटले असून, तिने शानदार कामगिरी केली असल्याचे सांगितले.
मोदी यांनी अंतिम पंघालला भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या असून, ती देशासाठी आणखी गौरव मिळवून देईल आणि इतर खेळाडूंना प्रेरणा देईल, अशी आशा व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर लिहिले; “आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम पंघालचे रौप्यपदक खरोखरच अनुकरणीय आहे! महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेतील शानदार कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन. तिने देशासाठी आणखी गौरव मिळवून द्यावा आणि इतर खेळाडूंना प्रेरणा द्यावी, अशा शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”
***
आशिष सांगळे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318837)
अभ्यागत कक्ष : 7