पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत, सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन
Posted On:
03 OCT 2026 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात मोठा विजय संपादन करत सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे, आणि या स्पर्धांमधे आतापर्यंत पाच सुवर्णपदके जिंकली आहेत असे मोदी म्हणाले. हॉकी संघाच्या या कामगिरीचे त्यांनी ‘असामान्य विजय’ असे वर्णन केले आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा हा विजय अगदी खास आहे कारण, पुरुष तसेच महिला अशा दोन्ही संघांनी एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई स्तरावर भारतीय हॉकीने आपली मान अभिमानाने उंचावली आहे असेही ते म्हणाले.
‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले :
“आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 भारतीय हॉकीसाठी खरोखरच विशेष ठरल्या आहेत !
अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल आपल्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक आणि आतापर्यंतचे एकूण पाचवे सुवर्णपदक- आपल्या खेळाडूंनी केलेली ही असामान्य कामगिरी आहे.
आजचा हा विजय आणखीनच खास ठरला कारण पहिल्यांदाच आपल्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही हॉकी संघांनी एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई स्तरावर भारतीय हॉकीने आपली मान अभिमानाने उंचावली आहे, हे तर निश्चित : पंतप्रधान @narendramodi”
***
सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318776)
अभ्यागत कक्ष : 8