पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत, सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे अभिनंदन
Posted On:
03 OCT 2026 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत, सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
देशासाठी हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे असे पंतप्रधान म्हणाले.
या संघातील सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले :
“सुवर्णपदक पुन्हा एकदा भारताकडे !
आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले विजेतेपद कायम राखल्याबद्दल आमच्या पुरुष क्रिकेट संघाचे अभिनंदन. हा देशासाठी खरोखरच आनंदाचा क्षण आहे. संघातील सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi"
***
सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2318749)
अभ्यागत कक्ष : 6