कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीएआरइ/आयसीएआर द्वारे देशव्यापी स्वच्छता मोहीम व सफाई मित्र सत्कार विशेष मोहीम 6.0 सुरू


केंद्रिय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आयसीएआर-सीसीएआरआय, गोवा इथे सफाई मित्रांचा सत्कार

Posted On: 03 OCT 2026 2:39PM by PIB Mumbai


कृषी संशोधन व शिक्षण विभाग (डीएआरइ) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांनी 2 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष मोहीम 6.0 चा प्रारंभ केला. याअंतर्गत देशभरातील आयसीएआर संस्था व आस्थापनांमध्ये व्यापक स्वच्छता आणि आरोग्य उपक्रम राबविले जाणार आहेत. या मोहीमेचा प्रारंभ करताना आयसीएआर मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीतील पुसा इथे राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलाच्या (एनएएससी) परिसरात स्वच्छता मोहीमेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. डीएआरइ व आयसीएआर यांची स्वच्छ व आरोग्यदायी कार्यस्थळाला प्रोत्साहन देण्याची आणि स्वच्छता संस्कृतीला चालना देण्याची एकत्रित वचनबद्धता या मोहीमेमुळे अधोरेखित झाली.

  

या विशेष मोहीम 6.0 चा भाग म्हणून डीएआरइ व आयसीएआरच्या देशभरातील संस्था व आस्थापनांनी स्वच्छता व आरोग्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये स्वच्छता मोहीम तसेच संस्था, गांव, रस्ते, पायवाटा आणि अन्य परिसरात श्रमदानाचा समावेश आहे. स्वच्छता, आरोग्य, कचरा व्यवस्थापन आणि सामाजिक जबाबदारी यांना चालना देण्यासाठी विशेष ग्रामसभा, स्वच्छता सभा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

गोवा येथील आयसीएआर केंद्रिय किनारी कृषी संशोधन संस्थेमध्ये श्रमिक सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रिय कृषी व कृषी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह  चौहान यांच्या हस्ते आयसीएआर-सीसीएआरआयमधील सफाई मित्रांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या सफाई मित्रांनी वर्षभर दिलेल्या योगदानाचा हा सन्मान होता. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयसीएआर-सीसीएआरआयचा स्वच्छता ही सेवा 2026 उपक्रमातील सहभाग व प्रयत्न यांची प्रशंसा केली. केंद्रिय राज्यमंत्री येसो नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमामधून स्वच्छतेची भावना, सेवाभाव, स्वच्छ व आरोग्यपूर्ण परिसरासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या सफाई मित्रांचा म्हणजेच श्रमिकांचा सन्मान करण्याची भावना अधोरेखित झाली. 

  

***

सुषमा काणे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318653) अभ्यागत कक्ष : 11