पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 65 किलो मुष्टीयुद्धात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून परवीनचे अभिनंदन

Posted On: 02 OCT 2026 6:11PM by PIB Mumbai

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 65 किलो वजनी गटाच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत चुरशीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल परवीनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

परवीनच्या या कामगिरीमुळे भारतीय मुष्टीयुद्धाच्या गौरवशाली वाटचालीत आणखी एका अध्यायाची भर पडली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तिचे यश अत्यंत प्रेरणादायी असून, क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तिची असलेली समर्पणभावना यातून अधोरेखित होते, असेही त्यांनी सांगितले.

पुढील वाटचालीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवीनला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

“एक शानदार सुवर्णपदक!  आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या 65 किलो वजनी गटाच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत चुरशीच्या अंतिम सामन्यानंतर सुवर्णपदक जिंकल्याबद्दल परवीनचे अभिनंदन. तिची ही उल्लेखनीय कामगिरी भारतीय बॉक्सिंगच्या गौरवशाली वाटचालीत आणखी एका अध्यायाची भर घालणारी आहे. तिचे यश अत्यंत प्रेरणादायी असून, क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तिची समर्पणभावना अधोरेखित करते. तिच्या आगामी वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा : पंतप्रधान @narendramodi”

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2318491) अभ्यागत कक्ष : 5