पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधे पुरुषांच्या स्किफ (Skiff) या नौकानयन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रिन्स नोबल आणि मनू फ्रान्सिस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 01 OCT 2026 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियायी क्रीडा स्पर्धा 2026 मधे पुरुषांच्या स्किफ (Skiff) या नौकानयन प्रकारात रौप्यपदक जिंकणाऱ्या प्रिन्स नोबल आणि मनू फ्रान्सिस यांचे अभिनंदन केले आहे.

या दोघांनी आपल्या आधीच्या कामगिरीत अधिक सुधारणा करत पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. ही कौशल्य आणि दृढनिश्चयाच्या बळावर घेतलेली एक उल्लेखनीय झेप आहे, अशा शब्दांत त्यांनी  त्यांच्या या कामगिरीचे वर्णन केले आहे.

पंतप्रधानांनी प्रिन्स नोबल आणि मनू फ्रान्सिस यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :

"एक विशेष आणि नेत्रदीपक रौप्यपदक!

आशियाई  क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या स्किफ या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रिन्स नोबल आणि मनू फ्रान्सिस यांचे अभिनंदन.

त्यांनी आपल्या आधीच्या कामगिरीपेक्षा उत्तम कामगिरी केली आणि यंदा पदक विजेत्यांच्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. ही खरोखरच कौशल्य आणि दृढनिश्चयाच्या बळावर घेतलेली एक उल्लेखनीय झेप आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2317841) अभ्यागत कक्ष : 8