पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विथ्या रामराजचे केले अभिनंदन
Posted On:
28 SEP 2026 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल विथ्या रामराजचे अभिनंदन केले.
ही खरोखरच एक उत्कृष्ट कामगिरी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी विथ्याचे अभिनंदन केले आणि भविष्यातही तिने यशाची नवनवीन शिखरे गाठत राहावीत अशी सदिच्छा व्यक्त केली.
पंतप्रधानांच्या कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"विथ्या रामराजची खरोखरच एक उत्कृष्ट कामगिरी! तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे. विथ्याचे अभिनंदन. भविष्यातही ती यशाची नवनवीन शिखरे गाठत राहो, ही सदिच्छा: PM @narendramodi"
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316309)
अभ्यागत कक्ष : 7