पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तम आरोग्य हा आपल्या जीवनातील चार उद्दिष्टांचा पाया असतो, हे सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 28 SEP 2026 12:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, आपल्या जीवनातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चार उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्तम आरोग्य हा मुख्य पाया असतो, हे सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. 

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे;

"सुखोपविष्टास्ते तत्र पुण्यां चक्रुः कथामिमाम् |

धर्मार्थकाममोक्षाणामारोग्यं मूलमुत्तमम्।।"

तेजस्वी महर्षींनी शांतचित्ताने ही पवित्र कथा सांगितली आहे. यानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ही जीवनातली चार उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्तम आरोग्य हा मुख्य पाया आहे. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315848) अभ्यागत कक्ष : 18