पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डेकॅथलॉनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन

Posted On: 27 SEP 2026 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डेकॅथलॉनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे.

दोन दिवस चालणाऱ्या आव्हानात्मक विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी विलक्षण अष्टपैलुत्व, सहनशक्ती आणि दृढनिश्चय आवश्यक असतो. तेजस्विन शंकर यांनी या तिन्ही गुणांचे प्रदर्शन करत आपली स्पर्धा दमदारपणे पूर्ण केली, ही कौतुकास्पद कामगिरी असल्याचे  पंतप्रधानांनी म्हटले आहे. आगामी वाटचालीसाठीही त्यांनी तेजस्विन शंकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स माध्यमांवरील एका संदेशात तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे.

"दोन दिवस विविध आव्हानात्मक क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी विलक्षण अष्टपैलुत्व, सहनशक्ती आणि दृढनिश्चय आवश्यक असतो. तेजस्विन शंकर यांनी या तिन्ही गुणांचे दर्शन घडवत आपली स्पर्धा दमदारपणे पूर्ण केली. ही कौतुकास्पद कामगिरी आहे. आगामी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. PM @narendramodi"

 

* * *

सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315703) अभ्यागत कक्ष : 6