पंतप्रधान कार्यालय
आशियायी क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर अडथळ्याच्या (स्टीपलचेस) शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पारुल चौधरी हीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
27 SEP 2026 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
आशियायी क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर अडथळ्याच्या (स्टीपलचेस) शर्यतीत दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पारुल चौधरी हीचे अभिनंदन केले.
पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवताना पारुल हीने आपली सर्वोत्तम वैयक्तिक वेळही नोंदवली, यामुळे हे यश अधिकच खास ठरले असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. पारुल हिची समर्पण वृत्ती आणि चिकाटीचा भारताला अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी पारुल हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश:
"आशियायी क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर अडथळ्याच्या (स्टीपलचेस) शर्यतीत पारुल चौधरी कांस्यपदक विजेती दमदार कामगिरी!
पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवताना तीने आपली सर्वोत्तम वैयक्तिक वेळही नोंदवली, यामुळे हे यश अधिकच खास ठरले आहे. तिची समर्पण वृत्ती आणि चिकाटीचा भारताला अभिमान वाटतो. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: PM @narendramodi"
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315693)
अभ्यागत कक्ष : 5