सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ललित कला अकादमीच्या 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 20 ललित कला अकादमी पुरस्कारांची घोषणा

Posted On: 27 SEP 2026 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

 

ललित कला अकादमी अर्थात राष्ट्रीय कला अकादमीतर्फे 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. भारतातील समकालीन दृश्यकलेतील हे एक महत्त्वाचे वार्षिक प्रदर्शन आहे. या प्रदर्शनातून कलाकारांना आपली कला देशभरातील प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ मिळत आहे. तसंच, देशातील विविध प्रकारच्या आणि बदलत्या दृश्यकलेचा अनुभव घेण्याची संधी रसिकांना मिळत आहे.

65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाला देशभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ललित कला अकादमीला 27 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 2 हजार 495 कलाकारांकडून 6 हजार 175 कलाकृती प्राप्त झाल्या. कठोर निवड प्रक्रियेनंतर, प्रथम स्तरावरील परीक्षक मंडळाने प्रदर्शनासाठी 270 कलाकृतींची निवड केली आहे.

निवडलेल्या कलाकृतींमध्ये चित्रकला, शिल्पकला, मुद्राचित्रण, रेखाचित्र आणि मिश्र माध्यमांसह विविध कला प्रकार, साहित्य आणि तंत्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनातून समकालीन भारतीय कलेतील वैविध्य आणि समृद्धता दिसून येते. तसंच, कलाकार नव्या साहित्याचा, कल्पनांचा आणि कलाप्रकारांचा सातत्याने वापर करत असल्याचंही या प्रदर्शनातून दिसून येते.

ललित कला अकादमी पुरस्कारांसाठी विजेत्या कलाकृतींची निवड करण्यासाठी गठित द्वितीय स्तरावरील परीक्षक मंडळाने 20 कलाकारांच्या 20 कलाकृतींची निवड केली आहे.

S. No.

Artist

Awarded Artwork

Medium

Category

1

Chandra Shekhar Sain

My Entire World - I

Terracotta

Sculpture

2

Gopal Chandra Naskar

The Tune of The Srimad Bhagavad Gita

Acrylic on Canvas

Painting

3

Kishor Kumar Narkhadiwala

Paryavaran

Oil on Canvas

Painting

4

Mrinal Dey

Hopeless Settlement

Acrylic on Canvas

Painting

5

Nidhi Chopra

Tangible Dreams

Ceramic

Sculpture

6

Nimai Singh Sarungbam

Mudra - I

Teak Wood

Sculpture

7

Pankaj Kumar Sharma

Haloed Traveler - II

Panel Works

Drawing

8

Pooja Rajpoot

Prakriti Shoshan

White Marble

Sculpture

9

Praveen Kumar

Where The Walls Remember

Mix Medium

Painting

10

Pritam Madhukar Deuskar

Of Time and The City

Etching

Printmaking

11

Rajendra Prasad

Sujata With Buddha

Water Color (Wash)

Painting

12

Ramesh Vithal Thorat

Untitled - II

Oil on Canvas

Painting

13

Raviram Ramakrishnan

Fisherwoman

Copper, Oxidised, Welded

Sculpture

14

Sanjay Kumar

When Memories Come Back - 7

Mix Media

Painting

15

Sanjay Kumar Sahani

Youth

Oil on Canvas

Painting

16

Sanjib Kumar Gogoi

Aakar Nirankar - II

Acrylic & Oil on Canvas

Painting

17

Santa Deb

Attraction of Simplicity

Ceramic

Sculpture

18

Siddharth Shahjirao Shingade

Trees

Mix Media

Painting

19

Usharanjan Mandal

Wheel of A Crowded City

Mix Media

Any Other Medium

20

Vijendra Sharma

Life 2025

Oil on Canvas

Painting

65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनामुळे केवळ कलाकारांना त्यांच्या कलेसाठी मान्यताच मिळत नाही, तर देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासही मदत होते. कलाकार, रसिक, कलासंग्राहक आणि विविध संस्थांना एकत्र आणल्यामुळे या प्रदर्शनातून कलाकारांना अधिक प्रसिद्धी आणि व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री यामुळे कलाकारांना थेट आर्थिक लाभही मिळतो. त्यामुळे त्यांच्या कलानिर्मितीला प्रोत्साहन मिळून दृश्यकलेसाठी अधिक शाश्वत वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

या प्रदर्शनातून ललित कला अकादमीची प्रस्थापित आणि नवोदित अशा दोन्ही कलाकारांना प्रोत्साहन देण्याची, नवनवीन प्रयोगांना चालना देण्याची आणि विविध कलाविष्कारांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची बांधिलकीही दिसून येते. 27 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कलाकारांचा सहभाग हा राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप या राष्ट्रीय प्रदर्शनातून अधोरेखित होते.

ललित कला अकादमीने 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनातील सर्व पुरस्कारप्राप्त आणि सहभागी कलाकारांचे अभिनंदन केले आहे. तसेच, या प्रदर्शनासाठी कलाकृतींची निवड करणाऱ्या परीक्षक मंडळांच्या मोलाच्या योगदानाचेही अकादमीने कौतुक केले आहे.

 

* * *

सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315671) अभ्यागत कक्ष : 15