पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुरुष कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक राखल्याबद्दल पंतप्रधानांनी संघाचे केले अभिनंदन

Posted On: 26 SEP 2026 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2026

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक राखत पुन्हा एकदा विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पुरुष कबड्डी संघाचे अभिनंदन केले. भारतीय संघाच्या या कामगिरीने देशाचा गौरव वाढला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. संघाच्या या यशामुळे असंख्य उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

या संदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केलेला संदेश:

“पुन्हा एकदा विजेते !

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक राखल्याबद्दल आपल्या पुरुष कबड्डी संघाचे अभिनंदन. त्यांच्या या निर्धाराने देशाचा गौरव वाढवला आहे. त्यांचे हे यश असंख्य उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणाही देईल.

संपूर्ण संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315405) अभ्यागत कक्ष : 9