पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वाश मिश्र सांघिक प्रकारातील कांस्यपदक विजेते जोश्ना चिनप्पा व वेलावन सेथिलकुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
26 SEP 2026 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वाश मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकलेल्या जोश्ना चिनप्पा व वेलावन सेंथिलकुमार यांचे अभिनंदन करुन त्यांच्या असामान्य कौशल्याची व निर्धाराची प्रशंसा केली आहे.
2010 सालापासून जोश्ना सातत्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन भारतासाठी पदक मिळवत असल्याचे नमूद करुन, तिचे सातत्य खरोखर लक्षवेधी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी दोन्ही खेळाडूंना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
“जोश्ना चिनप्पा व वेलावन सेंथिलकुमार यांचे आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वाशमध्ये मिश्र सांघिक प्रकारत कांस्यपदक जिकल्याबद्दल अभिनंदन. त्यांचे कौशल्य व निर्धार असामान्य आहे.
जोश्ना 2010 सालापासून सातत्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे आणि प्रत्येक वेळी पदकदेखील मिळवते आहे. तिचे कामगिरीतील सातत्य खरोखर लक्षणीय आहे.
भविष्यासाठी दोन्ही खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा.
PM @narendramodi”
* * *
माधुरी पांगे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315392)
अभ्यागत कक्ष : 8