विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्थेच्या (CSIR-NIScPR) वतीने प्रकाशित पाच भारतीय भाषांमधील लोकप्रिय विज्ञान मासिकांचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रकाशन
Posted On:
26 SEP 2026 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR - Council of Scientific and Industrial Research) 85 व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि आसामी या पाच भारतीय भाषांमधील नवीन लोकप्रिय विज्ञान मासिकांचे प्रकाशन करण्यात आले. ही मासिके वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्थेच्या (CSIR-NIScPR - CSIR-National Institute of Science Communication and Policy Research) वतीने प्रकाशित करण्यात आली आहेत.
या पाच मासिकांमध्ये आसामी भाषेतील विज्ञान लहर (Bigyan Lahar) हे, बंगालीमधील बिज्ञान बृत्तांतो (Bigyan Brittanto), मराठी भाषेतील विज्ञान क्षितिज (Vidnyan Kshitij), तमिळमधील अरिवियल अरिक्कैयालर (Ariviyal Arikkaiyalar) आणि विज्ञान वेलुगु (Vigyan Velugu) या तेलुगमधील मासिकाचा समावेष आहे. या मासिकांच्या प्रकाशनामुळे राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्थेच्या लोकप्रिय विज्ञानिक प्रकाशन उपक्रमाच्या व्याप्तीचा विस्तार घडून आला आहे. या संस्थेच्या वतीने विज्ञानाच्या प्रचार प्रसाराच्या उद्देशाने दीर्घकाळापासूनच सायन्स रिपोर्टर (Science Reporter - इंग्रजी), विज्ञान प्रगति (Vigyan Pragati - हिंदी) आणि सायन्स की दुनिया (Science ki Duniya - उर्दू) ही प्रमुख मासिके प्रकाशित केली जात आहेत. आता नव्याने प्रकाशित केलेली ही पाच मासिके याच परंपरेचा नवा टप्पा ठरली आहेत.

या प्रकाशन सोहळ्याला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालक तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या (DSIR) सचिव डॉ. एन. कलाईसेल्वी आणि राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. गीता वाणी रायसम उपस्थिती होते. वाचकांना त्यांच्या मातृभाषेत विश्वासार्ह आणि रंजक स्वरुपात वैज्ञानासंबंधीची ज्ञानविषयक माहिती उपलब्ध करून देणे, हा या मासिकांच्या प्रकाशनामागचा उद्देश आहे. यासोबतच विज्ञानाशी संबंधित त्या त्या क्षेत्रातील वैज्ञानिक यश, नवोन्मेष आणि घडामोडीही या मासिकांच्या माध्यमातून ठळकपणे वाचकांपर्यंत पोहचवले जाणार आहे.
राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्थेच्या वतीने सध्या प्रकाशित होत असलेल्या लोकप्रिय विज्ञान मासिकांमधील (विज्ञान प्रगति, सायन्स रिपोर्टर आणि सायन्स की दुनिया) निवडक मजकुर सुलभरित्या अनुवादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा केलेला वापर, हे या उपक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या झालेल्या या अनुवादाची विज्ञाननिनिष्ठतेच्या पातळीवरील अचूकता, भाषिक दर्जा आणि वाचनीयता योग्य असावी यासाठी तज्ञांकडून अशा मजकुराचे पुनरावलोकन, मुद्रितशोधन, तथ्य पडताळणी आणि संपादन करून घेतले गेले आहे. या अनुवादित मजकुरासोबतच या मासिकांमध्ये संबंधित भारतीय भाषांमधील मूळ लेखांचाही समावेश आहे. यामुळे प्रादेशिक भाषांमधील विज्ञान विषयक लेखनाला आणि त्या क्षेत्रातील संबंधित यशस्वी कामगिरीलाही प्रोत्साहन मिळणार आहे.
मुकेश अंबादास पुंड आणि डॉ. मेहेर वान यांनी या या पाच मासिकांच्या प्रकाशनासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली असून, संबंधित संपादक, संपादकीय चमू तसेच मासिकाची मांडणी करणाऱ्या चमूसह संस्थेमधल्या इतर कर्मचाऱ्यांनीही यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. या मासिकांच्या प्रकाशनानिमीत्त झालेल्या कार्यक्रमाला विज्ञान लहरचे (आसामी) संपादक डॉ. परमानंद बर्मन आणि सह संपादक डॉ. बर्नाली शर्मा, विज्ञान वृत्तांतोचे (बंगाली) संपादक डॉ. उत्तम कुमार जाना, विज्ञान क्षितिजचे (मराठी) संपादक मुकेश अंबादास पुंड, अरिवियल अरिक्कैयालरचे (तमिळ) संपादक डॉ. एस. भुवनेश आणि सह संपादक डॉ. एल. संधिया, तसेच विज्ञान वेलुगुचे (तेलुगू) संपादक डॉ. एन. के. प्रसन्ना हे संपादक आणि संपादकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
या मासिकांच्या प्रकाशनातून, राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्थेने समाजात व्यापक स्तरापर्यंत विज्ञानाचा प्रचार प्रसार करणे, आणि त्यासोबतच सर्वसमावेशक, बहुभाषिक तसेच वैज्ञानिकदृष्ट्या माहितीसंपन्न भारताची जडणघडण करण्याच्या संकल्पाला पाठबळ देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा या 85 व्या स्थापना दिनातून, संस्थेने विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय विकासाच्या क्षेत्रात दिलेल्या 84 वर्षांच्या योगदानाची गौरवपूर्ण दखलही घेतली गेली आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या 85 व्या स्थापना दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात, संस्थेच्या अखत्यारितील राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्थेच्या वतीने प्रकाशित पाच भारतीय भाषांमधील लोकप्रिय विज्ञान मासिकांचे प्रकाशन करताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह.
* * *
माधुरी पांगे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315287)
अभ्यागत कक्ष : 5