उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 25 SEP 2026 2:20PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती भवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे प्रख्यात विचारवंत आणि समाजसुधारक होते, असे त्यांचे स्मरण करताना उपराष्ट्रपती म्हणाले. भारतीय विचार आणि परंपरांवर आधारित व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांना सुसंवादी चौकटीत स्थान देणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानववादा’च्या तत्त्वज्ञानाचे त्यांनी स्मरण केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वतःपेक्षा राष्ट्र आणि राष्ट्र सेवेला नेहमीच सर्वोच्च स्थान दिल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

***

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314849) अभ्यागत कक्ष : 11