पंतप्रधान कार्यालय
आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून सीमा यांचे अभिनंदन
Posted On:
24 SEP 2026 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल सीमा यांच्याविषयी अभिमान व्यक्त केला आणि या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
त्यांच्या दृढनिश्चयी कामगिरीमुळे भारताला अनेक वर्षांनंतर या स्पर्धेत पदक मिळाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हे एक अप्रतिम यश असून त्यातून सहनशीलता, शिस्त आणि अनेक वर्षांचे कठोर परिश्रम दिसतात, असे मोदी यांनी नमूद केले. आगामी काळात त्यांनी आणखी अनेकदा यश संपादन करावे यासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.
'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले:
"आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल सीमा यांचा अभिमान आहे! त्यांचे अभिनंदन.
त्यांच्या दृढनिश्चयी कामगिरीने अनेक वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत पदक मिळवून दिले आहे. हे एक उत्तम यश सहनशीलता, शिस्त आणि अनेक वर्षांचे कठोर परिश्रम दर्शवते.
त्यांना पुढील वाटचालीत आणखी यश मिळो या शुभेच्छा: PM @narendramodi"
* * *
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314641)
अभ्यागत कक्ष : 5