अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआयने वन्यजीव तस्करीविरोधातील कारवाईत आसाममध्ये 86 जिवंत टोके गेको जप्त केले ; दोघेजण अटकेत

Posted On: 23 SEP 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराबाबत मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) अधिकाऱ्यांनी 22.09.2026 रोजी आसाममधील मारियानी येथील 'बंदर चालिया गाव ग्राउंड' येथे दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान, त्यांच्या ताब्यातून 'टोके गेको' (पाल प्रजाती) या लुप्तप्राय वन्यजीव प्रजातीचे 86 जिवंत टोके गेको  हस्तगत करण्यात आले आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या तरतुदींनुसार ते जप्त करण्यात आले.

'टोके गेको'चा समावेश वन्यजीव (संरक्षण) कायदा,  1972 च्या अनुसूची-I आणि सीआयटीईएस( CITES) च्या परिशिष्ट-II मध्ये आढळतो ,जो त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करतो. पकडण्यात आलेल्या दोन व्यक्तींना आणि हस्तगत केलेल्या जिवंत गेकोना, वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या संबंधित तरतुदींनुसार पुढील कायदेशीर कारवाईसाठी आसाममधील 'मारियानी रेंज फॉरेस्ट ऑफिस'कडे सोपवण्यात आले.

ही कारवाई वन्यजीव प्रजातींची होणारी अवैध तस्करी शोधून ती रोखण्यासाठी डीआरआय  करत असलेले निरंतर प्रयत्न अधोरेखित करते ; यामध्ये अशा प्रजातींचाही समावेश आहे ज्यांचा वापर त्यांच्या कथित औषधी गुणधर्मांसाठी केला जातो आणि अवैध बाजारपेठेत 'अपारंपरिक  पाळीव प्राणी' म्हणून त्यांना मागणी असते.

 
निलिमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2314211) अभ्यागत कक्ष : 7