अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाने नाव्हा शेवा बंदरातून, तीन कोटी रुपयांचे 10,000 किलोचे फटाके केले जप्त


बाटल्यांच्या मालामागे दडवून फटाक्यांची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न; टोळीच्या म्होरक्याला अटक

Posted On: 23 SEP 2026 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर, डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाने नाव्हा शेवा बंदरात परदेशातून आलेले फटाके जप्त केले आहेत. परदेशातून येणाऱ्या एका जहाजात, बॉटल्स आणि वॉलपेपर असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र त्याच्या आडून फटाक्यांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर, तपास करण्यात आला, त्यात हे फटाके लपवले असल्याचे आढळले.

सखोल तपासणी केल्यानंतर 19,800 फटाके ( त्यांना 288 गॅटलिंग म्हटले जाते) आढळले, त्यांचे वजन सुमारे 10,000 किलो इतके असून, बाजारभाव तीन कोटी रुपये इतका आहे. जहाजात केवळ पहिल्या तीन रांगांमध्ये जाहीर करण्यात आलेला माल होता, त्यापलीकडे संपूर्ण कंटेनर फटाक्यांनी भरला होता. या जहाजवरील संपूर्ण माल, सीमाशुल्क कायदा 1962 अन्वये जप्त करण्यात आला आहे.

परदेशी व्यापार धोरणांतर्गत फटाक्यांची आयात ‘प्रतिबंधित’ आहे. त्यासाठी परराष्ट्र व्यापार महासंचालकांकडून वैध परवानगी तसेच स्फोटक नियम, 2008 अंतर्गत पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (PESO) यांच्याकडून आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे.

तपासादरम्यान,संबंधित माल गुप्तपणे क्लीअर करून घेण्याचे प्रयत्न करणाऱ्या आणि या संपूर्ण गैरप्रकाराची आखणी आणि व्यवस्था करणाऱ्या सिंडिकेटमधील प्रमुख सदस्याला सीमाशुल्क कायदा, 1962  अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

या कारवाईतून,व्यावसायिक मालवाहतूक मार्गांद्वारे प्रतिबंधित वस्तूंची माहिती लपवून, गुप्तपणे आयात करण्याचे प्रकार शोधण्यावर  संचालनालयाने दिलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित होतो.

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2314187) अभ्यागत कक्ष : 13