संरक्षण मंत्रालय
भारत -श्रीलंका वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव स्लिनेक्स -26 ची विशाखापट्टणम येथे सांगता
Posted On:
23 SEP 2026 7:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
भारत आणि श्रीलंका यांच्यात विशाखापट्टणम येथे 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान आयोजित द्विपक्षीय सागरी सराव, स्लिनेक्स-26, च्या 13 व्या आवृत्तीची सांगता झाली. या सरावामुळे दोन्ही नौदलांमध्ये व्यावसायिक प्राविण्याबाबत आदानप्रदान, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि आंतरकार्यक्षमतेत वृद्धीसाठी संधी उपलब्ध झाली.
या सरावाच्या बंदर टप्प्यामध्ये भारत आणि श्रीलंकेच्या नौदलात व्यावसायिक संवाद , क्रॉस डेक भेटी आणि खेळ इत्यादी उपक्रमांचा समावेश होता.
तर सागरी सराव टप्प्यात समन्वित सागरी युद्धाभ्यास , हवाई मोहिमा, समुद्रात रात्रीच्या वेळी रसद पुरवठा आणि विशेष दलांचा सराव ज्यामध्ये व्हिजिट, बोर्ड, सर्च आणि सीझर (VBSS) आणि स्लिदरिंग ऑपरेशन्स यांचा समावेश होता.
सागरी टप्प्यामध्ये समन्वित सागरी कवायती, हवाई कारवाया, समुद्रात रात्रीच्या वेळी रसद पुरवठा आणि विशेष दलांचे सराव यांचा समावेश होता,ज्यात व्हिजिट, बोर्ड, सर्च अँड सीझर (VBSS) आणि स्लिदरिंग ऑपरेशन्सचा समावेश होता. या उपक्रमांमुळे दोन्ही दलांमध्ये कार्यान्वयन समन्वय आणि आंतरकार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यंत बहुमोल संधी उपलब्ध झाली.
स्लिनेक्स -26 मधून भारत आणि श्रीलंका यांच्यातील मजबूत सागरी भागीदारी आणि सुरक्षित आणि स्थिर हिंदी महासागर क्षेत्राप्रती असलेली दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित होते. स्लिनेक्स - 26 सागरी सराव, वर्धित सागरी सहकार्य, आंतरकार्यक्षमता आणि क्षमता निर्मितीच्या माध्यमातून भारताच्या महासागर संकल्पनेत तसेच शेजारी प्रथम या धोरणामध्ये योगदान देत आहे.
_20260923163209_375c9a.jpeg)
_20260923163223_81eab9.jpeg)
_20260923163243_c9a009.jpeg)
_20260923163255_5b93af.jpeg)
_20260923163308_7b61a0.jpeg)
_20260923163319_5aea76.jpeg)
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314134)
अभ्यागत कक्ष : 10