पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू हिचे भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल केले अभिनंदन

Posted On: 23 SEP 2026 2:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीराबाई चानू हिचे भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

मीराबाई चानूबद्दल भारताला अभिमान असून तिचा दृढनिश्चय आणि सातत्य देशाला सदैव प्रेरणा देत राहील असे सांगून पंतप्रधानांनी तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे: 

“@mirabai_chanu यांना मिळाले विशेष रौप्यपदक!

महिलांच्या 49 किलो वजनी गटातील भारोत्तोलन स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचा दृढनिश्चय आणि सातत्य देशवासीयांना प्रेरणा देत राहील. भारताला त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

PM @narendramodi"

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313842) अभ्यागत कक्ष : 15