पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील,हिमांशू ढिल्लन आणि पार्थ राकेश माने यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 21 SEP 2026 9:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये 10 मीटर एअर रायफल पुरुष सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, हिमांशू ढिल्लन आणि पार्थ राकेश माने यांचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले की, त्यांची एकाग्रता, सातत्य आणि सांघिक कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद आहे.

मोदी यांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल पुरुष सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, हिमांशू ढिल्लन आणि पार्थ राकेश माने यांचे अभिनंदन.

उत्तम एकत्रित गुणांसह ही खरोखरच एक कौतुकास्पद कामगिरी होती. त्यांची  एकाग्रता, सातत्य आणि सांघिक कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद आहे. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi

 

 

 

निलिमा चितळे/राजेश शिरभाते /प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2313230) अभ्यागत कक्ष : 7