संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री आणि नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या  उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने भारतीय हवाई दलाला (IAF) एलसीए एफओसी ट्विन सीटर ट्रेनर्स आणि 3  एचटीटी 40 बेसिक ट्रेनर्स आणि पीएचएलला 4  ध्रुव एनजी हेलिकॉप्टर्स सुपूर्द केले.

Posted On: 18 SEP 2026 7:34PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी विमानवाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत, 18 सप्टेंबर 2026  रोजी कर्नाटक मधील बेंगळुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारतीय हवाई दलाला  दोन 'एलसीए तेजस' 'एफओसी' श्रेणीतील दोन  आसनी प्रशिक्षक विमाने आणि तीन 'एचटीटी-40' (HTT-40) मूलभूत प्रशिक्षक विमाने, तसेच पवन हंस लिमिटेडला 4  'ध्रुव' नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर्स सुपूर्द केली.

अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरता  ही काळाची गरज असल्याचे सांगत संरक्षण मंत्र्यांनी अंतराळ क्षेत्रात पद्धतशीरपणे प्रगती करण्याच्या गरजेवर भर दिला.

नागरी आणि लष्करी हवाई वाहतूक क्षेत्रांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यास सक्षम परिसंस्था तयार करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

राजनाथ सिंह यांनी सध्या सुरू असलेल्या तांत्रिक प्रकल्पांमधील विलंब दूर करण्यासाठी वास्तववादी कालमर्यादा निश्चित करण्याचे आवाहन केले. विलंबामुळे गंभीर स्वरूपाच्या संरक्षणात्मक  गरजा पूर्ण करण्यात वेळ लागू शकतो, खर्च वाढू शकतो आणि तंत्रज्ञान कालबाह्य होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले.

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राकडे स्पर्धक म्हणून न पाहता सहयोगी  म्हणून पाहण्याची गरज आहे यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. ध्रुव एनजीचे नागरी उड्डाण क्षेत्रात प्रमाणीकरण आणि समावेश हा भारताच्या स्वदेशी नागरी विमान वाहतूक परिसंस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यावेळी बोलताना म्हणाले.

एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवी के म्हणाले  की, तेजस एफओसी ट्विन सीटर ट्रेनर्स, एचटीटी 40  बेसिक ट्रेनर्स आणि ध्रुव एनजी हेलिकॉप्टर्सचे हस्तांतरण हे विविध नागरी आणि संरक्षण गरजांसाठी प्लॅटफॉर्म विकसित करण्याची आणि वितरित करण्याची एचएएलची क्षमता दर्शवते. ते पुढे म्हणाले की, हे दोन प्लॅटफॉर्म एचएएलने वर्षानुवर्षे तयार केलेल्या क्षमतेची खोली आणि त्यांना समर्थन देणाऱ्या स्वदेशी एरोस्पेस परिसंस्थेची ताकद प्रतिबिंबित करतात.

या कार्यक्रमाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा उपस्थित होते.

***

सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2312292) अभ्यागत कक्ष : 8