युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक, विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 मध्ये, अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशा मुक्त अभियान आणि युवा कनेक्ट कार्यक्रमात, विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्याचे विद्यापीठांना आवाहन

Posted On: 18 SEP 2026 5:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातल्या 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा- केंद्री प्रमुख उपक्रमांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा सहभाग अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीला 40 केंद्रीय विद्यापीठे, 38 राज्य विद्यापीठे आणि 13 अभिमत व खासगी विद्यापीठांच्या कुलगुरूंसह एनएसयु, मणिपूर आणि एलएनआयपीई, ग्वाल्हेर यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशामुक्त अभियान आणि युवा कनेक्ट कार्यक्रम या उपक्रमांची माहिती विद्यापीठांच्या प्रमुखांना देण्यासाठी तसेच या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल, यावर या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी रक्षा खडसे यांनी कुलगुरूंना संबोधित करताना, विकसित भारत @2047 चे ध्येय पुढे नेण्यात शैक्षणिक संस्थांची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. तसेच, युवकांना सहभाग, नेतृत्व, समुदायाशी संवाद आणि विधायक चर्चेसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी विद्यापीठांना केले.

व्हीबीवायएलडी 2027 मध्ये, विविध विषयांवर आधारित उपक्रमांचा खडसे यांनी उल्लेख केला. विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यापीठांनी सक्रियपणे प्रोत्साहन व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या माध्यमातून युवकांना आपल्या कल्पना, सर्जनशीलता आणि उपाय मांडण्याची तसेच धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि राष्ट्रीय नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

नशामुक्त अभियानांतर्गत जनजागृती आणि युवकांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना अधिक बळ देण्याचे आवाहनही त्यांनी विद्यापीठांना केले. तसेच, युवा कनेक्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संधींशी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. युवकांशी संबंधित उपक्रमांचा विस्तार केवळ विद्यापीठ परिसरापुरता मर्यादित न राहता समाजापर्यंत पोहोचवण्यात शैक्षणिक संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे, रक्षा खडसे यांनी अधोरेखित केले.

या उपक्रमांमध्ये विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांचा अधिक व्यापक सहभाग असेल, हे सुनिश्चित करुन, युवा नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अधिक सक्षम वातावरण निर्माण करण्यास हातभार लावावा, असे आवाहन मंत्र्यांनी कुलगुरूंना केले.

व्हीबीवायएलडी 2027, नशामुक्त अभियान आणि युवा कनेक्ट कार्यक्रमांमध्ये विद्यापीठांचा सहभाग अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक कृतीबिंदू निश्चित करून बैठकीची सांगता झाली. या चर्चेत प्रा. निलोफर खान, प्रा. दिवाकर सिंह राजपूत, प्रा. कल्पना शर्मा, प्रा. दिबाकर चंद्र डेगा, दलजीत सिंह चौधरी आणि प्रा. सुरेश गोसावी यांच्यासह अन्य कुलगुरूंनी सहभाग घेतला.

***

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2312283) अभ्यागत कक्ष : 7