पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला, “पर्यावरण आणि हवामान बदलाच्या गतिशीलतेचे भवितव्य” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे करणार उद्घाटन


पर्यावरण आणि हवामान बदलाशी संबंधित आव्हाने, अशा महत्वाच्या विषयावर, संवाद साधण्याची आणि पर्यावरण नियमन अधिक मजबूत करण्याची या परिषदेतून मिळणार संधी

या परिषदेला 17 देशांचे मान्यवर न्यायाधीश, न्यायालयीन प्रतिनिधी आणि भारतातील मान्यवर राहणार  उपस्थित

Posted On: 18 SEP 2026 3:08PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला,  सकाळी दहा वाजताच्या सुमाराला, नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे “पर्यावरण आणि हवामान बदलाच्या गतिशीलतेचे भवितव्य” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाने, 19 आणि 20 सप्टेंबर 2026 असे दोन दिवस ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेला, पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमधील तसेच जिल्हा न्यायालयांमधील न्यायाधीश , विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ सरकारी अधिकारी, राज्य  न्यायिक अकादमी, राज्य विधी सेवा प्राधिकरणे, राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समित्या, राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणे , राज्य पाणथळ प्राधिकरणे आणि इतर संबंधित भागधारकांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील. तसेच, 17 देशांतील नामवंत न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधीही या परिषदेत एकत्र येणार आहेत.

या परिषदेद्वारे, पर्यावरण विषयावर, न्यायालयीन दृष्टिकोण, वैज्ञानिक ज्ञान, पर्यावरण नियमन पद्धती आणि सर्व संबंधित क्षेत्रातील संस्थात्मक अनुभव, अशा सर्व पैलूविषयी साधक बाधक चर्चा करण्यासाठी, एक मंच उपलब्ध होणार आहे. तसेच, पर्यावरण आणि हवामान बदलाची आव्हाने, या महत्वाच्या विषयावर संवाद करण्याची संधी यामुळे मिळेल. यात, धोरण आखणी, अंमलबजावणीतील त्रुटी यावरही चर्चा होऊन, पर्यावरण विषयक प्रशासन आणि संस्थात्मक सहकार्य अधिक वाढवण्यावर चर्चा होईल.

***

निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2312095) अभ्यागत कक्ष : 6