पंतप्रधान कार्यालय
20 व्या रोजगार मेळाव्यांतर्गत, 19 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते सरकारी सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण
Posted On:
18 SEP 2026 3:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 20 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी संस्थांमधील नवनियुक्त युवकांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण करतील. यावेळी ते नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना संबोधितही करतील.
हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाईल. नव्याने निवड झालेले उमेदवार महसूल विभाग, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, संरक्षण मंत्रालय यासह भारत सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होतील.
रोजगार मेळाव्यातून युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्यांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यावर असलेला सरकारचा निरंतर भर दिसून येतो. 20 व्या रोजगार मेळ्याच्या आयोजनानंतर, विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्रे मिळणाऱ्या तरुणांची एकूण संख्या सुमारे 12.75 लाख इतकी होईल.
***
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2312087)
अभ्यागत कक्ष : 25