पंतप्रधान कार्यालय
सर्वसमावेशक प्रशासन आणि प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामाईक
Posted On:
18 SEP 2026 1:20PM by PIB Mumbai
माजी वित्त आणि महसूल सचिव, हसमुख अधिया यांनी लिहिलेला एक लेख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केला आहे. या लेखात अधिया यांनी, दूरदृष्टीचा विचार, योग्य हेतू आणि उत्तम प्रशासन, भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी कसे उपकारक ठरत आहे, याविषयी आपली मते मांडली आहेत. हा लेख, लोककेंद्री धोरणे आणि प्रभावी प्रशासनामुळे झालेला आमूलाग्र परिणाम, देशाला मजबूत करण्याच्या प्रवासात कसा योगदान देत आहे, याची अत्यंत वेगळी मौल्यवान दृष्टी, या लेखातून मिळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
“गरीब आणि वंचितांना केंद्रस्थानी ठेवून जेव्हा धोरणे आखली जातात आणि त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाते, तेव्हा समाज आणि राष्ट्र या दोघांनाही बळकटी मिळते. भारताचे माजी वित्त आणि महसूल सचिव @adhia03 यांनी आपल्या या लेखातून दूरदृष्टी, योग्य हेतू आणि सुशासनाच्या माध्यमातून देशाला प्रगतीच्या नव्या मार्गावर कसे नेले जात आहे, हे स्पष्ट केले आहे. ”
https://www.amarujala.com/india-news/why-narendra-modi-is-successful-management-human-spiritual-qualities-2026-09-18
***
निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311976)
अभ्यागत कक्ष : 8