सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या विशेष मोहीम 6.0 ची प्रगती आणि तयारी
Posted On:
18 SEP 2026 12:33PM by PIB Mumbai
प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 2021 पासून दरवर्षी विशेष मोहीम आयोजित केली जात आहे. या मोहिमेचा वेग कायम राखण्यासाठी, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एमओएसपीआय) तसेच त्याच्याशी संलग्न आणि अधीनस्थ कार्यालये आणि स्वायत्त संस्थांनी ‘प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबाबत विशेष मोहिम’ (एससीडीपीएम) अंतर्गत नोव्हेंबर 2025 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली. या मोहिमेच्या प्रगतीवर एससीडीपीएम पोर्टलद्वारे मासिक देखरेख ठेवण्यात आली: या मोहिमेची परिणती पुढील प्रमाणे:
· 5617 फायलींचे पुनरावलोकन (भौतिक आणि ई-फाईल्स)
· 467 प्रत्यक्ष फायलींचा निपटारा
· 4680 ई-फाईल्स बंद करण्यात आल्या
· देशभरात 61 स्वच्छता मोहिमांचे आयोजन
· सार्वजनिक तक्रारींचा निपटारा :426
· सार्वजनिक तक्रारींवरील अपिलांचा निपटारा : 65
· भंगाराच्या विल्हेवाटीतून मिळालेला महसूल: 34,105/- रुपये
· याव्यतिरिक्त, पंतप्रधान कार्यालयाकडून आलेले संदर्भ, संसदीय आश्वासने आणि राज्य सरकारचे संदर्भ याच्या विल्हेवाटीवर विशेष भर देण्यात आला.
भारत सरकारने 2 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम 6.0 सुरू केली आहे. सुरू केली आहे. या मोहिमेत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘ई-कचऱ्याचे प्रभावी संकलन, विलगीकरण आणि विल्हेवाट’ यावर लक्ष केंद्रित केले जाईल. ही मोहिम दोन टप्प्यात आयोजित केली जात आहे: पूर्वतयारीचा टप्पा (15 - 30 सप्टेंबर 2026) आणि अंमलबजावणीचा टप्पा (2 - 31 ऑक्टोबर 2026). या मोहिमेत कार्यालयांमध्ये ‘स्वच्छता’ ही कार्यसंस्कृतीचा भाग बनवण्यावर आणि प्रलंबित कामे कमी करण्यावर भर दिला जाईल. यामध्ये पंतप्रधान कार्यालय, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राज्य सरकारे आणि संसद यांच्याकडून आलेले प्रलंबित संदर्भ शोधणे, विल्हेवाट लावायच्या अनावश्यक साहित्याचे प्रमाण निश्चित करून त्याच्या विल्हेवाटीची प्रक्रिया अंतिम करणे, आगामी अंमलबजावणी टप्प्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याकरता पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ई-कचरा संकलन आणि वर्गीकरणाच्या प्रभावी पद्धती निश्चित करणे, तसेच अभिलेख आणि जागा व्यवस्थापन पद्धती अधिक सक्षम करणे, या बाबींचा समावेश आहे.
मागील वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एमओएसपीआय) त्याची संलग्न कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये आणि स्वायत्त संस्थेसह विशेष मोहीम 6.0 राबवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि विशेष मोहीम 6.0 मध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी वचनबद्ध आहे.
***
नितीन फुल्लुके / राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311957)
अभ्यागत कक्ष : 5